अहिल्यानगर दि. ८ :- तौरल इंडियाच्या सुपा (ता.पारनेर) उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टरने सुपा येथे आगमन झाले. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे स्वागत केले. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.
#DevendraFadnavis #SupaMIDC #ToralIndia #IndustrialGrowth #MaharashtraProgress #Ahilyanagar #Parner #VikhePatil #Investment #JobsInMaharashtra #MakeInIndia #मुख्यमंत्री #सुपा #अहिल्यानगर #औद्योगिकविकास