अनुसूचित जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी इच्छुक संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 05/02/2026 5:30 PM

नांदेड :- आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दाम्पत्यांसाठी आदिवासी क्षेत्रामध्ये कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. 

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या सेवाभावी संस्थांना अर्थसहाय्य देण्यात येते.

त्याअनुषंगाने, सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी किमान १० नवदाम्पत्ये असणे आवश्यक आहे. सदर योजनेबाबत आदिवासी विकास विभागाच्या दिनांक १८ फेब्रुवारी २००९ च्या शासन शुद्धीपत्रकातील परिशिष्ट ‘ब’ मध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीप्रमाणे परिपूर्ण अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

इच्छुक सेवाभावी संस्थांनी आपले परिपूर्ण अर्ज व आवेदनपत्र प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, जि. नांदेड येथील माहिती सुविधा केंद्रामध्ये सादर करावेत. अर्ज सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील.

अधिक माहितीसाठी संबंधित संस्थांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या