महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार, क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 05/02/2026 8:33 PM

नांदेड  :- महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सन 2025-26 वर्षाकरीता व्यक्ती आणि संस्था यांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे. 

इतर मागास विकास विभागांतर्गत कार्यरत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांच्यामार्फत पुढील शासन निर्णय व शुध्दीपत्रकांन्वये विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पुरस्कारांसाठी पात्र व इच्छुक व्यक्ती तसेच संबंधित समाजाच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडुन रितसर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. 

अर्जदार व्यक्ती/संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरुपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहीत नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयातील नमुद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपुर्ण, चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. 

पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी शनिवार 21 फेब्रुवारी 2026 रोजी कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक सचिन खुणे यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या