सांगली - पेठ महामार्ग की मृत्युचा सापळा? प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/02/2026 11:27 AM

​सांगली ते पेठ या महामार्गाचे काम झाल्यापासून अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. लक्ष्मी फाटा ते डिग्रज फाटा हा पट्टा आता अत्यंत धोकादायक झाला असून दर आठवड्याला येथे अपघात होत आहेत.
​📍 मुख्य समस्या काय आहे?
डिग्रज कमानीजवळ चार रस्ते एकत्र येतात, तरीही तिथे एकही गतिरोधक (Speed Breaker) नाही! यामुळे वाहने सुसाट वेगाने येतात आणि सर्वसामान्यांचा जीव धोक्यात येतोय. रस्ता चांगला झाला म्हणून वेगाची मर्यादा ओलांडली जात आहे, ज्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.
​लोकहित मंचच्या वतीने आमची प्रशासनाकडे ठाम मागणी आहे:
✅ डिग्रज कमानीजवळ तातडीने गतिरोधक बसवावेत.
✅ अपघाती क्षेत्रात आवश्यक दिशादर्शक फलक लावावेत.
​प्रशासनाने अजून किती बळी जाण्याची वाट पाहायची? 

​- मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या