10 वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांनी 'भयमुक्त' आणि 'कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 11/02/2026 10:05 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सातारा दि. : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १२ वी (HSC) आण ि १० वी (SSC) च्या परीक्षांना अनुक्रमे दिनांक १० फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ पर्यंत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडवणारा हा एक महत्त्वाचा टप्पा असून, या काळात विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाखाली न राहता 'भयमुक्त' आणि 'कॉपीमुक्त' वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन मा.श्री. संतोष पाटील, जिल्ह्याधिकारी तथा अध्यक्ष दक्षता समिती संतोष पाटील यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यात एकूण १५ परीक्षक, इ. १२ वी चे ५२ आण ि इ. १० वी चे ११६ असे एकूण १६८ परीक्षा केंद्र असून या परीक्षा केंद्रात इ. १२ वी चे ३३५८५ विद्यार्थी आण ि इ. १० वी चे ३८०६६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पडतील असे सुकर वातावरण तयार करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्य े गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्ह्याधिकारी. संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती गठीत करण्यात आली.

परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर प्रत्येक वर्गामध्ये सी.सी.टि.व्ही., ड्रोन कॅमेरा द्वारे व्हिडीओ शुटींग तसेच भरारी व बैठेपथकामार्फत परीक्षा केंद्रांना भेटीचे नियोजन या सारख्या कडक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात परीक्षेतील व्यक्तिगत व सामुहिक गैरमार्गाच्या प्रकरणांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी एकूण ८ भरारी पथकासह १ विशेष महिला भरारी पथक नियुक्त केले आहे. परीक्षा केंद्रात कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण, मोबाईल फोन इत्यादी आणण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला वेळेआधी

Share

Other News

ताज्या बातम्या