भगूर येथे विर एकलव्य जयंती उत्सव साजरा
भगूर येथे वीर एकलव्य जयंती उत्सव व महाशिवरात्री उत्सव रविवार दिनांक 15 रोजी मोठ्या उत्सवामध्ये साजरा करण्यात आला. जयंती उत्सवाचे आयोजन नवनिर्वाचित नगरसेवक श्री बबलू जाधव यांनी आयोजित केले होते. प्रथम नगराध्यक्ष प्रेरणा ताई बलकवडे यांच्या हस्ते विर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व उत्सव सोहळ्यामध्ये भगूर मधील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी भगूर नगराध्यक्ष सौ प्रेरणाताई बलकवडे, उपनगराध्यक्ष श्री प्रसाद आडके , नगरसेवक दीपक बलकवडे, काकासाहेब देशमुख, विशाल बलकवडे नगरसेविका, लता थापेकर, सुजाता शिरसाट, माजी नगरसेविका संगीता पिंपळे, मातृशक्ती नाशिक. सुरेखा हांडगे, नाशिक वीर एकलव्य जयंती संयोजक, श्री रमेश पवार मा पोलीस उपअधिक्षक , श्री संतोष पिंपळे सर, सुनील घोरपडे समाजसेवक, गौतम हांडगे मनपा कनिष्ठ अभियंता, मंगेश पिंपळे , सचिन मुकणे आदिवासी महिला व भगूर येथील सर्व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.