नांदेड :- आगामी सण, उत्सवात ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियमान्वये ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादीवापराबाबत श्रोते गृहे, सभागृहे सामुहिक सभागृहे आणि मेजवाणीकक्ष यासारख्या. बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निवडीनुसार वर्षामध्ये 15दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12वाजेपर्यंत सुट जाहिर करता येईल, असे आदेशजिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.
ध्वनीक्षेपकाचा वापरास शिवजयंती एक दिवस, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती 1 दिवस, 1 मेमहाराष्ट्र दिन एक दिवस, गणपती उत्सवात दोन दिवस (पहिला दिवसव अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव तीन दिवस दिवस (पहिला दिवस,अष्टमी व नवमी), दिवाळी लक्ष्मीपुजन एक दिवस,ईद ए मिलाद एक दिवस, ख्रिसमस एक दिवस,31 डिसेंबर एक या दिवसासाठी सकाळी 6 ते रात्री12 वाजेपर्यंत सुट राहील. तसेच उर्वरित तीन दिवस हे ध्वनीप्राधिकरण तथा जिल्हा पोलिस अधिक्षक नांदेड यांच्या शिफारशीनुसार जिल्हातीलमहत्वाच्या कार्यक्रमासाठी गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिलेजाईल.
या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यााबाबतची सुट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त,स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकरण यांचीराहील, असेही आदेशात म्हटले आहे.