आपले सरकार सेवा केंद्रासाठी रहिवासी दाखल्याऐवजी स्वयंघोषणापत्र ग्राह्य

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 17/02/2026 11:33 AM

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यासाठी 13 फेब्रुवारी 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीत अर्जदार ज्या ग्रामपंचायत/गावाचा रहिवासी आहे, त्या गावातील ग्रामसेवक यांचा रहिवासी दाखला अर्जासोबत जोडणे अनिवार्य करण्यात आले होते.

मात्र सदर अट शिथिल करण्यात आली असून आता ग्रामसेवकांच्या रहिवासी दाखल्याऐवजी अर्जदारांनी स्वयंघोषणापत्र (Self-Declaration) अर्जासोबत जोडावे, असे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी कळविले आहे.

तरी इच्छुक अर्जदारांनी सुधारित सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या