महानगरपालिकेत “मराठी भाषा गौरव दिन ” साजरा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/02/2026 5:56 PM

नांदेड :- मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’* यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून महापालिकेत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापौर सौ.कविता संतोष मुळे यांच्या वतीने मराठी भाषा प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन करण्यात आले. हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. मराठी साहित्याचा गौरव करणे आणि मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

यावेळी बोलताना पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून दैनंदिन व्यवहारात मराठीतच संवाद साधण्याचे आवाहन केले. मराठीतील मान्यवर लेखक, कवि व महापुरुषांचे स्मरण ठेवून वाचनाची सवय जोपासावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त स.अजितपालसिंग संधु, उपायुक्त नितिन गाढवे, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादिक यांच्यासह मनपातील इतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या