अहिल्यानगर जिल्ह्यात तूर खरेदीस प्रारंभ; १० केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू....

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 27/02/2026 9:21 PM

🌾 जिल्ह्यात तूर खरेदीस प्रारंभ; १० केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू
अहिल्यानगर, दि. २७ : शासनाच्या आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात तूर खरेदीस सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १० खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून संबंधित केंद्रांवर शेतकरी नोंदणी व प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी बी. आर. पाटील यांनी दिली.
💰 हमीभाव व कालावधी
हंगाम : २०२४-२५
हमीभाव : ₹८,००० प्रति क्विंटल
नोंदणी मुदतवाढ : २४ मार्च २०२६ पर्यंत
खरेदी कालावधी : ९ फेब्रुवारी ते ९ मे २०२६
📍 मंजूर खरेदी केंद्रे (१०)
शेवगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, शेवगाव
जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था, पाथर्डी (मार्केट यार्ड)
श्रीदत्त पणन सहकारी संस्था, श्रीगोंदा (घारगाव)
रियल ॲग्रो फार्म प्रोड्युसर कंपनी, श्रीगोंदा (घुटेवाडी)
जय किसान फार्मर प्रोड्युसर कंपनी, श्रीगोंदा (मांडवगण)
राहुरी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, राहुरी
पारनेर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, पारनेर
बहादराबाद विविध कार्यकारी सोसायटी, कोपरगाव (रांजणगाव देशमुख)
चैतन्य कानिफनाथ कृषी फळे प्रक्रिया सहकारी संस्था, जामखेड (खर्डा)
पुण्यश्लोक कृषी पणन प्रक्रिया सहकारी संस्था, जामखेड (पिंपरखेड)
📑 आवश्यक कागदपत्रे
आधारकार्डची छायांकित प्रत
राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची प्रत (हस्तलिखित खाते क्रमांक नसलेली)
चालू वर्षाचा ७/१२ व ८-अ उतारा
तूर पिकाची ऑनलाइन नोंद
चालू मोबाईल क्रमांक
📲 ऑनलाइन प्रक्रिया
संपूर्ण खरेदी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे खरेदीची तारीख कळविण्यात येईल. एसएमएसमध्ये नमूद केलेल्या तारखेलाच तूर केंद्रावर आणणे बंधनकारक राहील.
तुरीची तपासणी एन.सी.सी.एफ.च्या निर्देशानुसार करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी चालू हंगामातील सर्वसाधारण सरासरी दर्जाची तूरच खरेदी केंद्रांवर आणावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
#TurKharedi #MSP #Ahilyanagar #HamiBhav #शेतकरी_हित #अहिल्यानगर_प्रशासन #तूर_खरेदी_केंद्र #महाराष्ट्र_शासन

Share

Other News

ताज्या बातम्या