नांदेड : शहरात वाढत्या उन्हाचा तडाखा आणि संभाव्य जलजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर, नांदेडच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी आज महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत शहरवासीयांच्या आरोग्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आणि आरोग्य सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस उपमहापौर दिपकसिंग रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा पाटील, माजी सभापती किशोर स्वामी, स्विकृत सदस्य डॉ. अंकुश वेवसरकर, अतिरिक्त आयुक्त निलेश सुकेवार, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिष्वे व इतर वैद्यकीय अधिका-यांची उपस्थिती होती.
या बैठकीत प्रामुख्याने पावसाळ्यापूर्वी आणि उन्हाळ्यातील उष्णतेमुळे होणारे आजार रोखण्यासाठी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत आणि आरोग्य केंद्रांत पुरेशा औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्याचे आदेश महापौरांनी दिले. शहरात लसीकरण प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. ज्या भागात आजारांचे प्रमाण अधिक आहे, तिथे विशेष फवारणी आणि पुरीकरण (Fogging) करण्याचे निर्देश देण्यात आले. आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचारी गेळेवर उपस्थित राहतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या, रुग्णांना कोणतीही गैरसोय होऊ नये वैद्यकीय अधिकान्यांनी रुग्णांसोबत सौहदार्य राखुन त्यांचा उपचार करावा, असे महापौरांनी श्यष्ट केले.
पालिकेच्या दवाखाण्यांमध्ये सी. सी. टी. व्ही. कॅमेरे, हजेरी नोंदविण्यासाठी बायोमैट्रीक मशिन अद्यावत करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. विशेष करून पालिकेच्या दवाखाण्यात वापरण्यात येणारी औषधे ही आवश्यकतेनुसार मागविण्यात यावीत जेणे करून खर्चात बचत होईल. त्याचप्रमाणे औषधी ठेवण्यासाठी सुसज्ज अशा भांडाराची निर्मीती करण्याबाबत यावेळी निर्देश देण्यात आले. तसेच औषधांची परिणाकारकाता संपण्यापूर्वी ती वापरात येण्याच्या दृष्टीकोणातुन वेळोवेळी आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यासाठी यावेळी आदेशीत करण्यात आले. नविन धुरीकरण (Fogging) मशीन्स खरेदी करण्याचा प्रस्तावासह तरोडा भागातील पालिकेच्या दवाखण्यामाध्ये प्रसुती व सोनोग्राफीची सुविधा आणि शिवाजी नगर दवाखाण्यामध्ये नव्याने ट्रॉमा सेंटर सुरु करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
"नागरिकांनी आपल्या परिसरातील स्वच्छता राखाची आणि आरोग्याच्या तक्रारी असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका आरोग्य केंद्राशी संपर्क साधाचा. शहर रोगमुक्त ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे," असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.