मालमत्ता थकबाकीदारांवर महापालिकेची धडक कारवाई मागील महिन्याभरात तब्बल १६५ नळ खंडित

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 25/03/2026 7:24 PM

नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या कर विभागामार्फत मालमत्ता कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली असून थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कठोर कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत मागील महिन्याभरात तब्बल १६५ मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे *आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या निर्देशानुसार *अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार* आणि *उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथकाकडून ही मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.

शहरातील थकबाकीदार मालमत्ता धारकांना वारंवार सूचना, नोटिसा देऊनही काही थकबाकीदारांकडून कर भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेने आता कठोर भूमिका घेत कर थकीत असलेल्या मालमत्ताधारकांचे नळ व ड्रेनेज कनेक्शन बंद करण्यात आले असून कोणतीही सूट किंवा तडजोड न करता थकबाकीदारांवर थेट नळ खंडनाची कारवाई करण्यात आली आहे.

नागरीकांनी सहकार्य करुन जप्ती टाळावी
मालमत्ता कर थकबाकीदारांची अचूक माहिती, क्षेत्रनिहाय नियोजन आणि वेळापत्रकबद्ध कारवाई या तीन बाबींवर भर देऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयामार्फत रोजच्या आढाव्यानुसार प्रगती तपासली जात असून थकबाकीदारांनी तातडीने कर भरणा केल्यास जप्ती कारवाई टाळता येऊ शकेल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या