सांगली शहरातील मूलभूत सुविधा आणि नागरिकांची सुरक्षा या विषयावर आज आम्ही प्रशासनाचे लक्ष वेधत आहोत. सांगली महानगरपालिकेच्या आदरणीय आयुक्त महोदयांना 'लोकहित मंच'च्या वतीने नम्र विनंती आहे की, त्यांनी शहरातील खालील प्रमुख ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करावी:
📍 छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसर
📍 नवीन आयर्विन पूल
📍 चिंतामणी नगर पूल
📍 शंभर फुटी रोड
महत्त्वाचा प्रश्न: अंधाराचे साम्राज्य! 🌑
दोन्ही मुख्य पुलांवर (आयर्विन आणि चिंतामणी नगर पूल) पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अपघाताची भीती वाढली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन हे दिवे कार्यान्वित करावेत, ही आमची प्रमुख मागणी आहे.
शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलावे, हीच अपेक्षा.
आपला नम्र,
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली