*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार अल्पसंख्यांक सेल सांगली जिल्हा यांच्या वतीने अल्पसंख्यांक सेल प्रांताचे अध्यक्ष अफजल फारुख साहेब यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक शहर व ग्रामीण जिल्ह्यातर्फे पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साहात मेळावा संपन्न झाला प्रास्ताविक व स्वागत करताना जिल्हाध्यक्ष आयुबभाई म्हणाले अल्पसंख्यांक असेल तर्फे जिल्हाभरात आम्ही कार्यकर्त्यांची मोठी फळी उभा केली असून सर्व सामान्य व अल्पसंख्यांक समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही रात्रंदिवस काम करत असून शरद पवार साहेब , व आमदार जयंत पाटील साहेब यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काम प्रमाणिकपणे करत असून सदर कामांमध्ये सेल मधील प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता काम करत आहे.. तसेच
येणाऱ्या काळामध्ये पक्ष वाढीसाठी अल्पसंख्यांक सेल जोमाने काम करेल...
यावेळी प्रदेश अध्यक्ष अफझल फारूक यांनी.....मुस्लिम महिलांना आवाहन केले की त्यांनी संघटने मध्ये सामील व्हावे....
यावेळी त्यांनी आमदार पडळकर,राणे व जगताप यांना इशारा दिला की त्यांनी मुस्लिम समाजास धमकवणे बंद करावे अन्यथा तुम्हाला तुमची जागा दाखवनेत येईल...
अल्पसंख्यांक सेल सांगलीच्या कार्याची त्यांनी प्रश्नषा केली..
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुष्मिता ताई जाधव महिला शहर जिल्हाध्यक्ष संगीताताई हारगे, अय्नुदिन मुजावर यांनी आपले मनोगत व्यक्त केले..
आभार इशाद भाई पखाली यांनी मानले
यावेळी अल्पसंख्यांक महिला शहर जिल्हाध्यक्षपदी आयेशा भाभी शेख यांची निवड करण्यात आली तसेच, मिरज शहर महिला अध्यक्ष म्हणून राईसा भाभी चिंचणीकर यांची निवड करण्यात आली, शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी रफिक नदाफ तसेच सांगली शहर व कुपवाड शहर ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
सदरचा मेळावा पक्ष कार्यालय आर आय टी ऑफिस इथे संपन्न झाला यावेळी उपस्थित कामगार सेल चे जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे, कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे, कुमार वायदंडे मामा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अझर भाई सय्यद, जुनेद जमादार,अल्पसंख्यांक सेल चे, असलम मुल्ला सोहेल नदाफ साहिल घोरी शाहरुख भाई, तसेच शहर जिल्ह्याचे फ्रंट सेलचे पदाधिकारी सांगली मिरज कुपवाड चे अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.