सदर फोटो,व्हिडिओ हे आपल्या सांगली शहरातील आहेत..
बाजारपेठेतील गर्दी बघितली तर समाधान वाटते. कारण मुंबई पुणे अशा मोठ्या शहरात अशा पद्धतीने वाहतूक कोंडी होत असते मात्र त्या ठिकाणी त्यांचा व्यापार आणि व्यवसायही तसाच असतो.
मात्र माझ्या सांगली शहरात वाहतूक कोंडी आहे मात्र आमच्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय मात्र नाही.
ह्यात चूक कोणाची रस्ते केलेले गटरी केल्या जवळच्यांना पक्षातील निष्ठावंतांना स्वीकृत नगरसेवक केलं तिकीट दिली निवडून आणलं कुणाला पाडलं हे सगळं राजकारण झालं.मात्र माझ्या शहराला तुमच्या सगळ्यांकडून काय मिळालं हा खरा प्रश्न... आमच्या सारख्याला कोणी भंपक म्हणेल.. कोणी तोड पाणी करणारा म्हणेल, कोणी ब्लॅकमेलिंग करणारा म्हणेल, सामाजिक कार्यकर्त्यांना पडतो कोण काय म्हणतो याचा फरक पडत नाही कारण ते काहीच करत नाहीत त्या मानाने आमच्या बुद्धीला जे सुस्त दिसतं त्याबाबत निदान आम्ही बोलतो तर ना असो..
तथाकथित सर्व सांगली जिल्ह्यातील ज्यांच्यामुळे सांगली जिल्हा आज पर्यंत ह्या परिस्थितीपर्यंत आला आहे चांगल्या वाईटला जे जे जबाबदार आहेत त्या सर्वांना प्रशासकीय आयपीएस आयएएस सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे परिस्थितीचा सामना करा बघा नेत्यांच्या कॅडबरी आणि त्यांच्या मागे पुढे करून रील काढण्यापेक्षा त्या पण काढा मात्रा आमच्या शहराचे म्हणजे सांगली मिरज आणि कुपवाड याचे योग्य नियोजन करा हीच तुम्हाला हात जोडून विनंती आहे.
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली