महापालिकेच्या वतीने "महात्मा बसवेश्वर" यांना अभिवादन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 19/04/2026 9:04 PM

नांदेड : जागतिक लोकशाहीचे जनक, थोर समाजसुधारक, क्रांतीयोगी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या कौठा येथील अश्वरूढ पुतळ्यास दिनांक १९.०४.२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता  *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी *उपमहापौर दिपकसिंग रावत* आणि *सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले* यांनी सुद्धा महात्मा बसवेश्वरांना अभिवादन केले.

महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील एक महान समाजसुधारक, तत्त्वज्ञ, कवी आणि लिंगायत संप्रदायाचे संस्थापक होते. त्यांनी कर्नाटकात सामाजिक समता आणि लोकशाही मूल्यांचा पाया रचला. महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील जातिव्यवस्था, विषमता दूर करून समानता, बंधुता आणि लोकशाही मूल्यांची रुजवण केली. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले.

याप्रसंगी खासदार डॉ.अजित गोपछडे, माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत, भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, सभागृह नेते महेश कनकदंडे, माजी सभापती किशोर स्वामी, माजी महापौर शैलजा स्वामी, महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, नगरसेवक अभिषेक सौदे, राजु यन्नम, किशोर भवरे,महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार यांच्यासह पालिकेचे इतर विभाग प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या