मंगेश चिवटे यांना विधानपरिषद आमदार करा : जनतेतून जोरदार मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/05/2026 9:15 PM

राज्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले मंगेश चिवटे यांना विधान परिषदेत आमदार म्हणून संधी द्यावी, अशी जोरदार मागणी आता राज्यभरातून होताना दिसत आहे. सामान्य नागरिक, शिक्षक संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ही मागणी उचलून धरली आहे.

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत मिळवून देणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आधार देणे, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणे, तसेच राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबविणे या कामांमुळे मंगेश चिवटे यांनी जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विशेषतः गरीब आणि गरजू रुग्णांसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जात आहे. अनेक रुग्णांना वेळेत शस्त्रक्रिया, औषधोपचार आणि आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठी धडपड केली आहे. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे.

राजकीय क्षेत्रातही संयमी, अभ्यासू आणि लोकांशी सातत्याने जोडलेले नेतृत्व म्हणून मंगेश चिवटे यांच्याकडे पाहिले जाते. विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या सभागृहात त्यांच्यासारख्या सामाजिक भान असलेल्या व्यक्तीला संधी मिळाल्यास सामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावरही “मंगेश चिवटे यांना विधान परिषद आमदार करा” ही मागणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत समर्थन दर्शविले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या