हनुमाननगर मधील भाजी मंडईला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण व सदर मंडई तात्काळ पूर्ण क्षमतेने चालू करण्याची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/05/2026 8:27 PM

प्रति-मा. आयुक्त, महापौर, विरोधी पक्ष नेते सो ............... #प्रभाग क्रमांक 17 हनुमाननगर मधील लोकार्पण केलेली भाजी मंडईला #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_नामकरण_करणेबाबत व तात्काळ पूर्ण क्षमतेने सुरु करण्याबाबत...

महोदय,
प्रभाग क्रमांक 17 मध्ये दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी पालकमंत्री यांच्या शुभहस्ते उदघाटन झालेली भाजी मंडई आज बंद अवस्थेत व नशेखोरांचा अड्डा बनला आहे.उदघाटन करताना स्थानिक नगरसेवकांनी फक्त स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचे व आम्ही काही तर करतोय हा दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. आज सहा महिने उलटून नगरसेवकांनी भाजी मंडई सुरु करण्यासाठी कोणताही ठोस नियोजन केले नाही म्हणूनच आज ही सुंदर वस्तू बंद व बकाल अवस्थेत आहे.
ज्या भाजी मंडईचे उदघाटन झाले त्याची दर्शनी बाजू रंगरंगोटी करून लाली पावडर लावली आहे व मागील बाजूस शौचालय अत्यंत बकाल अवस्थेत आहे. फक्त मुरूम टाकून, निकृष्ट दर्ज्याचे बांधकाम करून,ओबड-धोबड काम केले आहे.
सदरच्या वास्तूचे उदघाटन पालकमंत्री यांनी केले आहे मग अर्धवट काम करून फक्त श्रेय लाटण्यासाठी नगरसेवकांनी केलेले उदघाटन ही पालकमंत्राची दिशाभूल केली आहे असं आमच मत आहे.
100 फुटी घाटगे पाटील शोरूम समोर जो सौदा होतो तोच सदर भाजी मंडईमध्ये सकाळी झाला पाहिजे जेणेकरून रस्त्यावर  विकली जाणारी भाजी ही बंधीस्त वस्तू मध्ये व स्वच्छ मिळेल. तसेच या ठिकाणी सौदा सुरु झाल्याने लोकांना ही समजेल की या ठिकाणी भाजी मंडई आहे, व लोकांची भाजी खरेदीसाठी ये जा सुरु होईल..
आज आठवडा बाजार संकल्पनामुळे रस्त्यावर भाजी घ्यायला लोक तुफान गर्दी करतातं व अस्वछ भाजी खरेदी करतात. उभारलेली ही वस्तू अत्यंत देकनी असून अश्या वस्तू प्रत्येक प्रभागात उभारल्या पाहिजेत, जेणेकरून लोकांना स्वच्छ ठिकाणी व धुळमुक्त भाजी घेता येईल.
सदर निवेदनाचा विचार करून आपण या भाजी मंडई पूर्ण क्षमतेने सुरु करण्याबाबत कार्यवाही कराल व निकृष्ट झालेल्या बांधकामाची चौकशी कराल ही अपेक्षा..
निवेदन देताना लोकसेवा व विकास कृती समितीचे निमंत्रक अमर पडळकर, शहाजी भोसले, नगरसेवक सभापती अतुल माने, नगरसेवक विष्णू माने, नगरसेवक अभिजित भोसले, वरद पडळकर, समीर मोमीन, बसवेश्वर औंधे, शशिकांत शिंदे उपस्तिथ होते.

Share

Other News

ताज्या बातम्या