नांदेड :- जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त लेखा अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल रामजी असोरे यांना अहमदपूर येथील अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आज कास्ट्राईब संघटना जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष श्याम कावळे, विस्तार अधिकारी विठ्ठल कांबळे, आर. पी. केंद्रे, कक्ष अधिकारी विजय वाघमारे, गोविंद गट्टूवार, अमोल पाटील, मिलिंद व्यवहारे आदी उपस्थित होते. यावेळी विठ्ठल असोरे यांचा नांदेड येथे शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.