राणाप्रताप मंडळ, कुपवाडच्या ५ खेळाडूंची राज्य अजिंक्यपद खो- खो स्पर्धेसाठी निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/05/2026 12:37 PM

कुपवाड येथील राणाप्रताप मंडळाचे पाच खेळाडूंची सोलापूर येथे होणाऱ्या कुमार/मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली.
              दिनांक 2 ते 5 जून 2026 या कालावधीत नेहरु नगर सोलापूर येथे होणाऱ्या 52 व्या कुमार मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी राणाप्रताप मंडळाच्या 5 खेळाडूंची सांगली जिल्हा संघात निवड झाली आहे. विटा येथे पार पडलेल्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत मंडळाच्या कुमार संघाने कर्णधार प्रथमेश कनाळे यांच्या नेतृत्वाखाली उपविजेतेपद पटकावले होते.यातून कुमार गटात सार्थक हिरेकुर्ब, रितेश बिरादार, तेजस कोष्टी,व निल पाडळे या चौघांची तर मुंलीच्या गटात अंजली वाघे हिची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या मंडळाच्या खेळाडूंना खो-खो संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौरव भाऊ नायकवडी व संघटनेचे सचिव डॉ.प्रशांत इनामदार यांनी अभिनंदन करुन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
निवड झालेल्या खेळाडूंना राणाप्रताप मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील,रमेश पाटील, प्रशिक्षक संतोष कर्नाळे, संजय हिरेकुर्ब, प्रा.सचिन चव्हाण, विशाल बन्ने, महेंद्र पाटील,प्रा.विजय पाटील, विजय पाडळे,सागर नरदेकर, महेश कर्नाळे,अतुल पाटील, अनिल पाटील, शेखर स्वामी, राहुल गवळी,सागर पाटील,धनपाल आडमुठे, महावीर राजोबा, प्रमोद वालकर, शितल अकिवाटे,शितल कर्नाळे,अक्षय पाटील, धनंजय पाटील, तक्षक गौंडाजे,सुनिल सुतार, अभिषेक कर्नाळे,निलेश पवार, अमोल पाटील, अभिजीत सुतार, शुभम पाटील, दिपक पाडळे,स्वप्नील पाटील, अनिल हिरेकुर्ब, पोपट नरदेकर,वासुदेव जमदाडे आदींचे मार्गदर्शन मिळत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या