शेतकरी कर्जमुक्तीसाठी जयहिंद सेनेचा आमदार रोहित यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा : चंदनदादा चव्हाण

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/06/2026 5:24 PM

पंढरपूर ता. 14 जून. 2026 

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी, विशेषतः कोणतीही अट न घालता कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पुकारलेल्या अन्नत्याग उपोषणाला रविवारी जय हिंद सेना पक्षाने आपला जाहीर पाठिंबा दिला.यावेळी जय हिंद सेनेचे शिष्टमंडळ उपोषणस्थळी दाखल झाले. गुंठेवारी चळवळीचे जनक व पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी सरकारवर निशाणा साधत सांगितले की, “शेतकरी आज संकटात आहे, अशा वेळी त्यांच्यावर अटी लादून कर्जमाफी करणे हा अन्याय आहे. जय हिंद सेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील.”प्रदेशाध्यक्ष रामदास सावंत यांनीही या वेळी स्पष्ट केले की, राज्यभरातील शेतकऱ्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी पक्ष कटिबद्ध आहे. या वेळी आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष अमोल माने, प्रवीण पाटील यांच्यासह जय हिंद सेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.उपोषणस्थळी झालेल्या या उपस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक मोठी ताकद मिळाली असून, कर्जमाफीच्या मागणीला आता व्यापक पाठिंबा मिळत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या