नांदेड :- गाव करील ते राव करील या म्हणीप्रमाणे लोहा तालुक्यातील मौजे शेवडी बाजीराव ग्रामपंचायतीचे तरूण तडफदार विकासमुख कर्तव्यदक्ष युवा सरपंच यांनी शेवडी बाजीराव गावात त्यांचे काका शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे व माजी सरपंच कैलास धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या उत्कृष्ट व विविध विकास कामाची दखल दै. लोकमत वृत्तपत्र समुहाने घेऊन त्यांना दि. ११ जून २०२६ रोजी अत्यंत मानाचा समजला "लोकमत सरपंच आॅफ द इयर (उदयोन्मुख सरपंच) पुरस्कार देऊन सन्मान केला असल्यामुळे शेवडी बाजीराव गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
ग्रामपंचायत कार्यालय शेवडी बाजीराव चे सरपंच बसवेश्वर धोंडे यांना ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’ (उदयोन्मुख सरपंच) पुरस्कार प्राप्त झाला व सदरील पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण व दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार यांच्या हस्ते देण्यात आला.
'लोकमत महासरपंच अवॉर्ड' यामध्ये गावाचा कायापालट करणारे, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे आणि उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी जलसंधारण, स्वच्छता, डिजिटल ग्रामपंचायत, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आणि कोरोना काळातील उत्कृष्ट कार्य यांसारख्या विविध निकषांवर आदर्श सरपंच शोधून त्यांचा गौरव पुरस्कारांतर्गत उत्कृष्ट काम राज्य आणि जिल्हा स्तरावर सन्मानित करण्यात आले यामध्ये नांदेड जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांचा पुरस्कार शेवडी बाजीराव ग्रामपंचायतीचे तरूण तडफदार विकासमुख कर्तव्यदक्ष युवा सरपंच बसवेश्वर धोंडे यांना देऊन त्यांचा एका विशेष कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
*चौकट*
२०२६ दैनिक लोकमत चा सरपंच आॅफ द इयर ( उदयोन्मुख सरपंच) पुरस्कार प्राप्त झाल्याबदल शेवडी बाजीराव ग्रामपंचायतीचे सरपंच बसवेश्वर धोंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की,
महाराष्ट्र राज्यात महत्वाचा समजला जाणारा मानाचा लोकमत सरपंच आॅवार्डस वर्ष ५ वे हा पुरस्कार मी तालुक्यातील शेवडी बाजीराव येथील सरपंच बसवेश्वर वैजेनाथ धोंडे मी माझे काका प्रा. मनोहर धोंडे सर संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली आणि २५ वर्षांपेक्षा जास्त काळ कामकाज ग्राम पंचायतीचे पहाणारे काका कैलास धोंडे यांच्यासह मला साथ देणारे संपुर्ण ग्रामपंचायतीचे सहकारी सदस्य ग्रामविकास अधिकारी हरीहर विश्वासराव , ग्रामपंचायतीचे कर्मचारी व गावातील सर्व नागरिक यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला असुन यामुळे माझ्या खांद्यावर कामाचे आणखी ओझे पडले असुन सर्वांच्या सहकार्याने शेवडी बाजीराव ग्रामपंचायत ही राज्यात एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जावी यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे असे सरपंच बसवेश्वर धोंडे म्हणाले.