मुंबई-हैदराबाद 'वंदे भारत स्लीपर' सुरु करण्याची खा. अशोकराव चव्हाण यांची मागणी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 29/06/2026 8:14 PM

नांदेड:-राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी मनमाड- छत्रपती संभाजीनगर- नांदेड मार्गे मुंबई-हैदराबाद 'वंदे भारत स्लीपर' रेल्वे सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. 

नजीकच्या काळात भारतीय रेल्वेकडून देशातील प्रमुख शहरांना 'वंदे भारत स्लीपर' रेल्वे सेवेने जोडले जाणार आहे. याच अनुषंगाने खा. अशोकराव चव्हाण यांनी ही मागणी केली आहे. आपल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या सोयीच्या दृष्टीने मनमाड- छत्रपती संभाजीनगर- नांदेड मार्गे मुंबई-हैदराबाद 'वंदे भारत स्लीपर' रेल्वे सुरु करण्याची आवश्यकता आहे. ही रेल्वे सेवा सुरु झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल व महाराष्ट्रातील एका विस्तृत पट्ट्याला या अत्याधुनिक आणि प्रीमियम सेवेचा थेट लाभ मिळेल. रेल्वेमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करावा, अशीही विनंती त्यांनी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या