सांगली: सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिके मार्फत अलीकडे च घरपट्टी च्या वाढीव आकरणी संदर्भात नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत त्या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने मा.आयुक्त यांना निवेदन देण्यात आले ,
सदर निवेदनात , आकारणी मध्ये अनेक करांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अतिरिक्त आर्थिकभर पडत आहे. सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका ही ड वर्ग महानगरपालिका असतानायेथील घरपट्टीची आकारणी इतर समकक्ष महानगरपालिकेच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाढीव घरपट्टी आकारणी रद्द करण्यात यावी.
दर वाढीव आकारणी बाबत खालील हरकती व आक्षेप आहेत -
१) सामान्य कर : सामान्य कर ०.१% दराने आकारण्यात आला असला तरी रेडीरेकनर दरांवर आधारित मालमत्ता मुल्यांकनामुळे कराची रक्कम अवास्तव वाढली आहे. त्यामुळे सदर कर आकारणी आम्हाला मान्य नसूसन, रेडीरेकनर ऐवजी वस्तुनिष्ठ व न्याय्य निकषांवर मालमत्ता मुल्यांकन करून सुधारित घरपट्टी आकारण्यात यावी.
२) पाणीपुरवठा लाभ कर आकारण्यात येत आहे. मात्र सार्वजनिक नळ योजना बंद करण्यात आलेली आहे. नागरिकांकडून पाणीपुरवठयाची बिले स्वतंत्ररपणे वसूल केली जात असल्याने लाभ कर आकारणे अन्यायकारक असून तो रद्द करण्यात यावा.
३) जलनिसारण (ड्रेनेज ) कर आकारण्यात आला आहे. परंतु कुवाड शहर परिसरात अद्याप पूर्णपणे ड्रेनेज व्यवस्था उप्लाध नाही. सुविधा उप्लाध नसताना हा कर आकारणे योग्य नसून तो तत्काळ रद्द करण्यात यावा.
४) शिक्षण उपकर व महा शिक्षण कर अशा दोन स्वतंत्र करांची आकारणी करण्यात येत आहे. एकाच उधेशासाठी दोन कर आकारणे उचित नसल्याने यापैकि एक कर रद्द करण्यात यावा.
५) खुल्या भूखंडावरील कर रद्द करण्यात यावा.
६) उपयोगकर्ता शुल्क आकारण्यात आले आहे सांगली, मिराज व कुपवाड महानगरपालिका ड वर्गातील असताना, अनेक मोठ्या कोल्हापूर व पुणे महानगरपालिकांमध्ये ही अशा प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे हे शुल्क रद्द करण्यात यावे.
७) ३) साफसफाई कर (आरोग्य कर) सध्याच्या दराने आकारण्यात येत आहे. मात्र परिसरातील स्वछता, आरोग्य सेवा व सार्वजनिक शौचालयांच्या सुविधा अत्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे हा कर ०.१% च्या निम्मा करण्यात यावा.
वरील सर्व बाबींचा गांभिर्याने विचार करून वाढीव व अन्यायकारक घरपट्टी व आकारणी रद्द करावी अशी मागणी
निवेदनात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
यावेळी शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज , प्रदेश निरीक्षक शेखर माने , मा.नगरसेवक शेडजी मोहिते , तानाजी गडदे ,डॉ शुभम जाधव , सुभाष तोडकर , विनायक हेगडे ,नंदकुमार घाडगे, दत्ता पाटील, जुबेर मुजावर ,श्रीशैल्य ढोले, अमित चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.