🔴 सांगलीकरांनो, एक प्रश्न विचारायलाच हवा!
आज विधानसभेत जयंत पाटील साहेबांनी घरपट्टीचा ज्वलंत प्रश्न उपस्थित केला. जनतेच्या अडचणी सभागृहात मांडण्याचे काम त्यांनी केले.
मात्र सांगली-मिरजेचे आमदार कुठे आहेत?
सांगलीकरांवर वाढीव घरपट्टीचा बोजा पडत असताना, सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना, आपल्या लोकप्रतिनिधींनी या विषयावर ठोस भूमिका घेतली का?
जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिलेले आमदार आज गप्प का आहेत?
सांगलीकरांच्या घरपट्टीचा प्रश्न महत्त्वाचा नाही का?
सांगली-मिरजेच्या नागरिकांची काळजी कोण घेणार?
लोकप्रतिनिधींनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून नागरिकांच्या हितासाठी आवाज उठवला पाहिजे. कारण जनता प्रश्न विचारत आहे आणि उत्तराची अपेक्षा करत आहे.
#सांगली #मिरज #घरपट्टी #सांगलीकर #जनतेचाप्रश्न #लोकप्रतिनिधी #विधानसभा