महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरी सोसायटीचा ऐतिहासिक बिनविरोध ठराव; जगनाथ पंढरीनाथ खाडे यांची निवड

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 07/07/2026 5:07 AM

अहिल्यानगर | प्रतिनिधी
सभापती ना. प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मा. अजय (दादा) काशिद आणि अॅड. प्रविण सानप यांच्या नेतृत्वात अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजुरी सोसायटीचा ऐतिहासिक बिनविरोध ठराव झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने जगनाथ पंढरीनाथ खाडे यांच्या नावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
या बिनविरोध निवडीमुळे राजुरी परिसरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सहकार क्षेत्रातील पक्षाची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी जगनाथ पंढरीनाथ खाडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकरी हिताच्या दृष्टीने प्रभावी काम करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला.

Share

Other News

ताज्या बातम्या