रेल्वे बोर्डाचा आदेश असूनही टीओडी स्पेशल गाडयांना नियमित भाडे लागू नाही, प्रवाशांची होतेय कोट्यावधींची लूट...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/07/2026 2:15 PM


तसेच  कोल्हापूर कुर्डूवाडी आषाढी स्पेशल गाडी क्रमांक ( 01209/ 10) कायमस्वरूपी सुरू करून तिचा कलबुर्गी पर्यंत विस्तार करण्याची मागणी*

 *खासदार विशाल दादा पाटील यांना रेल्वे प्रवासी संस्थेचे निवेदन*

रेल्वे बोर्डाने 17 मार्च 2026 रोजी ट्रेन ऑफ डिमांड (टीओडी) स्पेशल गाड्यावरील विशेष भाडे रद्द करून त्यांना नियमित मेल/एक्सप्रेस अथवा पॅसेंजर गाड्यांचा दर्जा देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही मध्य रेल्वे प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने लाखो प्रवाशांकडून कोट्यावधी रुपयांची अतिरिक्त भाडेवसुली सुरूच आहे. यामुळे एक प्रकारे मध्य रेल्वेकडून प्रवाशांची गेल्या तीन महिन्यांपासून अतिरिक्त भाडे वसूल करून लूट केली जात आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ विभागातील बारा जोड्या टीओडी स्पेशल गाड्यांवर आजही विशेष भाडे आकारले जात आहे.

रेल्वे बोर्डाचा आदेश असूनही या गाड्यांना नियमित दर्जा न दिल्याने प्रवाशांना प्रत्येक प्रवासात जादा भाड्याचा आर्थिक फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे गेल्या तीन महिन्यांत प्रवाशांच्या खिशातून कोट्यावधी रुपये वसूल झाले आहेत. रेल्वे बोर्डाने नियमित करण्यासाठी 14 गाड्यांचा समावेश केला होता. त्यापैकी पुणे–दानापूर अमृत भारत एक्सप्रेस आणि नागपूर–मडगाव एक्सप्रेस या केवळ दोनच गाड्या नियमित करण्यात आल्या असून उर्वरित बारा जोड्या गाड्या मात्र आजही स्पेशलच्या नावाखाली धावत असून त्यांच्याकडून विशेष भाडे आकारले जात आहे.

कोल्हापूर–पुणे मार्गावर धावणारी कोल्हापूर–पुणे स्पेशल (सह्याद्री एक्सप्रेस) ही गाडी आजही टीओडी स्पेशल म्हणून धावत आहे. मार्च 2026 मध्ये या गाडीचा खडकीपर्यंत विस्तार करून गाडी क्र. 11419/11420 कोल्हापूर–खडकी एक्सप्रेस म्हणून नियमित सुरू करण्याचा रेल्वे बोर्डाचा आदेश होता. तरीही ही गाडी आजही स्पेशल टीओडी तत्त्वावर चालत आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी तसेच प्रवाशांकडून झालेल्या अतिरिक्त भाडेवसुलीबाबत निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे.

*प्रवाशांवर कोट्यावधी रुपयांचा आर्थिक भार*

17 मार्च 2026 रोजीच्या रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार इतर झोनल रेल्वेने ट्रेन ऑफ डिमांड विशेष गाड्या नियमित मेल, एक्सप्रेस व सुपरफास्ट दर्जात सामान्य तिकीटदरांनी सुरू केल्या आहेत. मात्र मध्य रेल्वेने अद्यापही या गाड्यांवर विशेष तिकीटदर कायम ठेवला आहे. त्यामुळे प्रवाशांना कोट्यावधी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

 रेल्वे प्रशासनाकडे तातडीने सर्व टीओडी स्पेशल गाड्यांना नियमित दर्जा देऊन सामान्य तिकीटदर लागू करावेत तसेच त्याची अधिकृत अंमलबजावणीची तारीख त्वरित जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
मध्य रेल्वे प्रशासनाने आषाढी यात्रेनिमित्त गाडी क्र. 01209/01210 कोल्हापूर–कुर्डूवाडी विशेष रेल्वेगाडी दिनांक 21 जुलै ते 29 जुलै या कालावधीत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, ही गाडी केवळ आषाढी यात्रेपुरती मर्यादित न ठेवता ती कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी, अशी कोल्हापूर, सांगली, मिरज, कुर्डूवाडी, सोलापूर व परिसरातील प्रवासी, नागरिक आणि विविध प्रवासी संघटनांची रास्त मागणी आहे.

यासोबतच, या गाडीचा कलबुर्गीपर्यंत विस्तार करण्यात यावा. सकाळच्या सत्रात कोल्हापूर–कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्यात यावी व कलबुर्गी येथून रात्रीच्या वेळी परतीची सेवा उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल. तसेच शिक्षण, नोकरी, व्यापार, उद्योग, वैद्यकीय उपचार आणि धार्मिक प्रवासासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल.

यापूर्वी मुंबई–कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस व मुंबई–सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस या गाड्यांची परस्पर रेक लिंक व्यवस्था होती. महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर येथे आल्यानंतर ती कोल्हापूर–सोलापूर एक्सप्रेस म्हणून धावत असे, तर सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर येथे आल्यानंतर ती सोलापूर–कोल्हापूर एक्सप्रेस म्हणून धावत असे. या दोन्ही सेवांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र, नंतर ही व्यवस्था बंद करण्यात आली आणि पुढे 'झिरो टाइम टेबल बेसिक'च्या कारणास्तव ही रेल्वे सेवा पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे कोल्हापूर–सोलापूर–कलबुर्गी मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

आजही या मार्गावर नियमित, जलद आणि सोयीस्कर रेल्वे सेवेची मोठी गरज आहे. त्यामुळे सध्या आषाढी यात्रेनिमित्त चालविण्यात येत असलेली कोल्हापूर–कुर्डूवाडी विशेष गाडी कायमस्वरूपी सुरू करून तिचा कलबुर्गीपर्यंत विस्तार करण्याची मागण्याचे निवेदन माननीय खासदार विशाल दादा पाटील यांना देण्यात आले यावेळी 
*किशोर भोरावत*
*मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य*
*संदीप शिंदे*
*कार्याध्यक्ष, रेल्वे प्रवासी संस्था, मिरज जंक्शन*
*राजेंद्र पाटील*
*उपाध्यक्ष, रेल्वे प्रवासी संस्था, मिरज जंक्शन*
 वाय. सी. कुलकर्णी व मधुकर साळुंखे आदीने निवेदन दिले 

 *प्रवाशावर कोट्यावधी रुपयांचा आर्थिक भार*

 *मार्च 2026 रोजीच्या रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार इतर झोनल रेल्वेने ट्रेन ऑफ डिमांड विशेष गाड्या नियमित मेल/ एक्सप्रेस व सुपरफास्ट दर्जात सामान्य तिकिटदारांनी सुरू केल्या आहेत मात्र मध्य रेल्वेने अद्यापही या गाड्यांवर विशेष तिकीट दर कायम ठेवला आहे त्यामुळे प्रवाशांना कोट्यावधी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे रेल्वे बोर्डाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून संबंधित गाड्या सामान्य तिकीट दरात कधीपासून सुरू होणार याची अधिकृत तारीख मध्य रेल्वे जाहीर करावी.*

*किशोर भोरावत*
*मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य*

Share

Other News

ताज्या बातम्या