'लोकांकित समाजरत्न पुरस्कार–2026' ने शिवाजी बाबुराव सवंडकर यांचा गौरव

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 06/07/2026 1:25 PM

नांदेड:-दैनिक लोकांकितच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळा दि.28 जून 2026 रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला.समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी 'लोकांकित समाजरत्न पुरस्कार–2026' देऊन गौरविण्यात आले.या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी हिंगोली येथील शिवाजी बाबुराव सवंडकर यांची निवड करण्यात आली. समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र,शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याला पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील,मराठी चित्रपट अभिनेते अमित भानुशाली,अभिनेते रणजीत जोग,ज्येष्ठ समाजसेवक नानजीभाई ठक्कर,दैनिक लोकांकितचे संपादक संजय पवार,मराठी व हिंदी मालिकांतील अभिनेत्री संपदा वगळ यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवाजी बाबुराव सवंडकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी दैनिक लोकांकित परिवाराच्या वतीने बोलताना, समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हे वृत्तपत्राचे सामाजिक कर्तव्य असल्याचे सांगण्यात आले.विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळावी,या उद्देशाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे संपादक संजय पवार यांनी नमूद केले.पुरस्कार स्वीकारल्यानंतर शिवाजी बाबुराव सवंडकर यांनी दैनिक लोकांकित परिवाराचे आभार मानत,हा सन्मान अधिक जबाबदारीने समाजसेवा करण्याची प्रेरणा देणारा असल्याची भावना व्यक्त केली.दैनिक लोकांकितच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली.

Share

Other News

ताज्या बातम्या