राष्ट्रीय दुखवट्यानिमित्त 13 जुलै रोजी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्याचे निर्देश;मनोरंजनाचे शासकीय कार्यक्रम रद्द

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/07/2026 8:06 PM

नांदेड : कतार देशाचे अमीर, महामहिम शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या दिनांक 12 जुलै 2026 रोजी झालेल्या दुःखद निधनाबद्दल भारत सरकारने सोमवार, दि. 13 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार ज्या ठिकाणी दररोज नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व शासकीय कार्यालये व संस्थांमध्ये दि. 13 जुलै रोजी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्यात यावा. तसेच दि. 14 जुलै 2026 पासून राष्ट्रध्वज नेहमीप्रमाणे पूर्ण उंचीवर फडकविण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय दुखवट्याच्या दिवशी कोणतेही मनोरंजनाचे शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असेही केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. सर्व संबंधित शासकीय कार्यालये, विभाग आणि संस्थांनी गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय दुखवट्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या