अहिल्यानगर, दि. १३ : मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना २०२६-२७ अंतर्गत नेवासा विधानसभा क्षेत्रातील विविध कामांसाठी पात्र कंत्राटदारांच्या नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र कंत्राटदारांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज दि. १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद पाकिटात उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांच्या कार्यालयात समक्ष सादर करावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना उपविभाग, अहिल्यानगर यांनी प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या प्रचलित तासिका दर (एल-१) दराच्या आधारावर कंत्राटदारांचे नामनिर्देशन करण्यात येणार आहे.
योजनेसंदर्भातील जाहिरात, अटी-शर्ती, आवश्यक कागदपत्रांची माहिती तसेच अर्जाचा नमुना अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
इच्छुक कंत्राटदारांनी विहित कालावधीत, शासकीय सुट्टीचे दिवस वगळून अर्ज सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
#पाणंदरस्ते2026 #RuralRoads #अहिल्यानगर #Ahilyanagar #बळीराजाशेतयोजना #InfrastructureGrowth #नेवासाविधानसभा #NevasaUpdates #कंत्राटदारसंधी