लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळेत अभिवादन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/07/2026 6:23 PM

अर्धापूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक, राष्ट्रपुरुष, समाजप्रबोधनकार आणि शिक्षणतज्ज्ञ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळा, येळेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री जी. बी. मदने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती महाराज या होत्या. व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री विजय रणभीडकर, श्री शेषेराव वाघमारे यांची उपस्थिती होती.
   प्रमुख पाहुणे श्री जी. बी. मदने यांनी आपल्या मार्गदर्शनात लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हा लोकमान्य टिळक यांचा घोष आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी टिळक यांचे राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, कर्तव्यनिष्ठा, शिस्त, शिक्षणप्रेम आणि समाजसेवेचे विचार आपल्या जीवनात आत्मसात करून त्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. लोकमान्य टिळक यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीसाठी आजही दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असून त्यांच्या आदर्शांचे जतन करणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. पी. पवार यांनी केले, तर श्री विजय रणभीडकर यांनी आभार प्रदर्शन केले.
    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. अर्चना मुंगल, जी. एम. भुस्से, शिवाजी वाघमारे, प्रदीप भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. शेवटी उपस्थितांनी लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा अंगीकार करून राष्ट्रहित, समाजहित आणि शिक्षणाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Share

Other News

ताज्या बातम्या