वाढीव घरपट्टीविरोधात कुपवाडमध्ये फुंकले रणशिंग, मंगळवारच्या बंद व मोर्चासाठी कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती व कुपवाड व्यापारी संपटना नागरिक व सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीत एकजुट

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/08/2026 10:13 PM

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने लादलेल्या वाढीव व अन्यायकारक घरपट्टीच्या निषेधार्थ मंगळवार दि. 04 ऑगस्ट 2026 रोजी सांगली, मिरज व कुपवाड शहर बंद ठेवत महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी कुपवाडमध्ये घरपट्टीविरोधी कृती समिती, कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती,व्यापारी संघटना आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली.

बैठकीस घरपट्टीविरोधी कृती समितीचे प्रमुख शंभूराज काटकर, सतीश साखळकर, हणमंतराव पवार , विराज कोकणे , युवराज शिंदे ,नितिन मिरजकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले.सांगली आणि मिरजेच्या तुलनेत कुपवाड शहराला महापालिकेकडून सातत्याने दुय्यम वागणूक मिळाल्याची खंत व्यक्त केली.मंगळवार दि.04/08/2026 रोजच्या शहर बंद व मोर्चानंतरही घरपट्टीचा निर्णय मागे घेतला नाही, तर पुढील काळात रस्ता रोकोसह अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

बैठकीत बोलताना शंभूराज काटकर यांनी अन्यायकारक घरपट्टीविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. कुपवाडमधील नगरसेवकांनी नागरिकांच्या बाजूने ठाम भूमिका घेतल्याचे सांगत त्यांनी नगरसेवक प्रकाश पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते सनी धोतरे यांच्यासह आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.नागरिकांना गृहीत धरून त्यांच्यावर अन्यायकारक कर लादण्याचा निर्णय हाणून पाडण्यासाठी मंगळवारी दि.04/08/2026 रोजी होणाऱ्या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

माजी नगरसेवक हणमंतराव पवार यांनी वाढीव घरपट्टीस नेमका विरोध का हे नियम आणि कायदेशीर बाबीतून मुद्दे मांडले.तर कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी इतक्या आंदोलनानंतर आणि विरोधानंतरही जर वाढीव घरपट्टी जर कमी झाली तर न्यायालयीन लढा लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरु आस्की यांनी व्यापारी संघटनेचा संपूर्ण पाठिंबा आंदोलनाला असल्याचे स्पष्ट करत सर्व व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन केले. 

कार्याध्यक्ष अनिल कवठेकर यांनी यापूर्वीच्या आंदोलनांप्रमाणे याही लढ्यात यश मिळेल,असा विश्वास व्यक्त करत घरपट्टीविरोधातील लढ्याची ठिणगी कुपवाडमधूनच पेटणार असल्याचे सांगितले.

नगरसेवक प्रकाश पाटील यांनी आपण आणि नगरसेविका प्राजक्ता धोतरे यांनी सभागृहात सुरुवातीपासूनच घरपट्टीवाढीला विरोध केला असून आता रस्त्यावर उतरूनही नागरिकांसोबत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. 

व्यापारी महासंघाचे राजेंद्र पवार यांनी महापालिकेत समावेश झाल्यापासून कुपवाड शहरावर सातत्याने अन्याय झाल्याचा आरोप करत आता घरपट्टीच्या माध्यमातूनही नागरिकांवर अन्याय होत असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे रुपेश मोकाशी यांनी कुपवाडमधील सर्व व्यापाऱ्यांनी दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. 

बैठकीत सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील यांनीही आक्रमक भूमिका मांडली.व या शहर बंदसाठी पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील यांनी मूलभूत सुविधा न देता घरपट्टी वाढविण्याचा महापालिकेचा हट्ट नागरिकांना मान्य नसल्याचे सांगत आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

प्रणव पाटील यांनी हे आंदोलन नागरिकांच्या हक्कांसाठी असून प्रत्येक नागरिकाने बंद आणि मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन केले.

माजी उपमहापौर मोहन बापू जाधव यांनी या अन्यायी घरपट्टी ला कुपवाडकरांचा नेहमीच विरोध आहे तो राहिल असे मत मांडले आणि आभार प्रदर्शन केले.

बैठकीच्या शेवटी उद्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहर येथे बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, नागरिक, सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकजुटीने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. वाढीव घरपट्टीचा निर्णय मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती,व्यापारी संघटना यांचे सर्व पदाधिकारी,संचालक,सामाजिक कार्यकर्ते,विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते..

Share

Other News

ताज्या बातम्या