सांगली, दि. २१ ऑगस्ट २०२६ : एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध व अटक, दोषारोपपत्र वेळेत न्यायालयात दाखल करणे, मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा शोध व मुद्देमालाची जप्ती/परतावा, प्रलंबित गुन्हे व तक्रारींचा प्रभावी निपटारा आदी बाबींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यास प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
पोलीस ठाण्याने CCTNS, e-FIR व e-Sakshya प्रणालीमध्ये १०० टक्के अनुपालन राखत सायबर गुन्हे व सायबर पेट्रोलिंगमध्ये तात्काळ व प्रभावी कारवाई केली. तसेच प्रतिबंधक कारवाई, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, महत्त्वाच्या व संवेदनशील कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट बंदोबस्ताचे नियोजन करणे, महिला व बालकांच्या तक्रारींचे संवेदनशीलतेने निराकरण करणे, जनतेशी उत्तम समन्वय साधणे तसेच पोलीस–जनता संबंध दृढ करणे यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले.
याशिवाय बीट पेट्रोलिंग व प्रतिबंधात्मक गस्त अधिक प्रभावीपणे राबवून परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात आले. अवैध धंद्यांविरुद्ध प्रभावी कारवाई करून विविध विशेष मोहिमांमध्येही एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या सर्व उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत श्री. रंजन कुमार शर्मा, भा.पो.से., विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्या हस्ते एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अधिकारी-अंमलदार यांच्या कार्याची प्रशस्तीपत्र देऊन प्रशंसा करण्यात आली.
यावेळी श्री. तुषार दोशी, भा.पो.से., पोलीस अधीक्षक, सांगली यांच्या उपस्थितीत सदर प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या सर्व अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या सामूहिक व उत्कृष्ट कार्यामुळे पोलीस ठाण्याने प्रथम क्रमांक मिळवून ही गौरवास्पद कामगिरी केली आहे. या यशाबद्दल सर्व स्तरांतून एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याचे अभिनंदन होत आहे.