जलसंधारण दिनानिमित्त नांदेडमध्ये ‘वॉक फॉर वॉटर’महावॉकथॉन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 19/08/2026 8:33 PM

नांदेड :- माती व जलसंवर्धनाचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासह जलसंधारणाच्या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने २१ ऑगस्ट २०२६ रोजी जलसंधारण दिनानिमित्त नांदेड येथे ३ किलोमीटर अंतराची ‘वॉक फॉर वॉटर’ महावॉकथॉन आयोजित करण्यात आली आहे.

शासकीय तंत्रनिकेतन मैदान, नांदेड येथे सकाळी ६ वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. सकाळी ६ वाजता सहभागींचे आगमन व नोंदणी, ६.१५ वाजता वॉर्म-अप व पूर्वतयारी, ६.४५ वाजता मृद व जलसंधारणाची शपथ आणि ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते महावॉकथॉनचा शुभारंभ होईल.

सकाळी ७ ते ८ या वेळेत ३ किमी ‘वॉक फॉर वॉटर’ महावॉकथॉन होणार असून, त्यानंतर सांगता समारंभात मान्यवरांचे जलसंधारणविषयक मार्गदर्शन, संदेश तसेच रील स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव व प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.

‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ हा संदेश देत आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमातून माती व पाण्याचे संवर्धन, जलसंधारणाची गरज आणि त्यातील लोकसहभाग याबाबत व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे.

“पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा” आणि “माती वाचवा – पाणी वाचवा – सुरक्षित भविष्य घडवा” हा संदेश घेऊन होणाऱ्या या महावॉकथॉनमध्ये विद्यार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि जलसंधारणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मृद व जलसंधारण विभाग, नांदेड यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या