सांगली, दि. १८ ऑगस्ट २०२६ : स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी तसेच वीज ग्राहकांच्या विविध समस्यांचे निराकरण करावे, या मागणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या स्मार्ट मीटर हटाव कृती समिती, सांगली जिल्हा यांच्या वतीने मंगळवारी (दि. १८) गुंठेवारी भवन, सांगली येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
गुंठेवारी चळवळीचे जनक तथा स्मार्ट मीटर हटाव कृती समितीचे अध्यक्ष मा. चंदनदादा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे नेते, आजी-माजी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीमध्ये उपस्थित मान्यवरांनी स्मार्ट मीटरमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, वाढीव वीज बिले, मीटरमधील तांत्रिक दोष तसेच वीज ग्राहकांच्या विविध तक्रारी याबाबत आपली मते मांडली. ग्रामीण भागासह सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांच्या तक्रारी कृती समितीकडे प्राप्त होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीतील प्रमुख निर्णय
१. सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्मार्ट मीटरबाबत व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येणार.
२. प्रत्येक तालुक्यात वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठका व ग्राहक मेळावे आयोजित करण्यात येणार.
३. स्मार्ट मीटरविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा, स्वरूप आणि रणनीती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सांगली महापालिका क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागातून हजारो वीज ग्राहक आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे समितीचे अध्यक्ष मा. चंदनदादा चव्हाण यांनी सांगितले.
आंदोलनाची अंतिम तारीख उद्या जाहीर होणार
स्मार्ट मीटर हटावसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य आंदोलनाची अंतिम तारीख बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती मा. चंदनदादा चव्हाण यांनी दिली.
बैठकीस उपस्थित मान्यवर
मा. चंदनदादा चव्हाण, श्री. आसिफ बावा, श्री. आयुब पटेल, श्री. महेश मासाळ, श्री. नितीन मिरजकर, सौ. सीमा गायकवाड, श्री. दत्ता पाटील, श्री. सुरेंद्र गायकवाड, श्री. अरुण रुपनर, श्री. गोरख व्हनखंडे, श्री. सरवर खान, श्री. युवराज मोने, श्री. शंकर तुपे, श्री. सतीश देसाई, श्री. हुसेन शेख, श्री. डॅनियल भोपळे, श्री. बाळू कांबळे, श्री. आदर्श नलवडे, श्री. विशालसिंग राजपुत, श्री. रामभाऊ पाटील, श्री. अब्दुल मन्नान शेख, श्री. जैलाब शेख, श्री. रामदास सावंत, श्री. श्रीधर करडे, श्री. विजय बल्लारी, श्री. प्रवीण पाटील, श्री. मारुती घुटुगडे, श्री. बापू अवघडे, श्री. अरुण सावंत, श्री. जीवन मोरे आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
— स्मार्ट मीटर हटाव कृती समिती, सांगली जिल्हा