*भगूर , ति.झं. विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 20/08/2026 8:47 AM

*भगूर , ति.झं. विद्यामंदिरात   विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण*
*नाशिक एज्युकेशन सोसायटी* संचलित
*ति.झं.विद्यामंदिर शाळेत कै तेजस शिंदे याचे स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व खाऊ वितरित करण्यात आला मुख्याध्यापिका मनीषा देशपांडे 
  यांनी  उपस्थितां चे स्वागत केले. याप्रसंगी  देणगीदार जयेश शिंदे ,विजय गव्हाणे यांनी तेजस शिंदे यांच्या आठवणींना उजाळा दिला, आणि *कै. तेजस शिंदे याचे स्मरणार्थ 35 शालेय दप्तर व खाऊ वितरित करण्यात आले* 
 याप्रसंगी व्यासपीठावर प्राथमिक विद्यामंदिर   मुख्याध्यापिका वंदना आडके, निखिल गवळी, विराज गोडसे ,आशिष काजळे, शुभम बोराडे, वैभव तुपे, मनसेचे  कार्यकर्ते, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
सूत्रसंचालन व निवेदन हेमंत काशीकर यांनी केले.  पाहुण्यांचा परिचय विजया चतुर यांनी केला
उपस्थितांचे आभार वंदना आडके यांनी मानले.

Share

Other News

ताज्या बातम्या