देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गणेशोत्सव शांतता समिती बैठक संपन्न -पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचे १८ कडक नियम जारी,डिजेला परवानगी नाही ,पारंपरिक वाद्यांने सण उत्सव साजरे करा..
नाशिक l प्रतिनिधी आगामी गणेश उत्सव शांततेत व सुरक्षित पार पडावा यासाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात शांतता समिती बैठक घेण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बैसाने, महावितरण अभियंता सुरेश पाचंगे, कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकारी शामराज धात, विशाल गोडसे, भगूर नगर परिषद अधिकारी सोनाली शिरसाट, पोलीस पाटील स्वाती पानसरे,संजय गायकवाड, संदीप रोकडे, नगरसेवक दीपक बुंदेले,सामाजिक कार्यकर्ते तेजस बुंदेले, नितीन गायकवाड, निवृत्ती मुठाळ,सायरा शेख, रविंद्र भदाणे, संजय गीते, प्रमोद मोजाड, पंडित साळवे, संतोष गायकवाड, राजू जाधव,भारत वाघमारे,अर्चना पारचा, देवळाली कॅम्प परिसरातील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी PI उमेश पाटील यांनी BNSS १६८ अन्वये १८ नियम जारी केले. *रात्री १२ ते सकाळी ६ DJ बंद, ५० डेसिबल मर्यादा, रोडवर मंडप नाही, CCTV बंधनकारक, सक्तीची वर्गणी नाही, अश्लील गाणी नाही, दि. २६ सप्टेंबर पर्यंत मंडप काढणे बंधनकारक* असे प्रमुख नियम सांगितले. नियम मोडल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक उमेश पाटील ,सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बैसाने यांचा सत्कार करतांना गावळीवाडा मंडळाचे तेजस बुंदेले, शिवयुवा प्रतिष्ठानचे प्रमोद मोजाड, नगरसेवक दिपक बलकवडे,चंद्रकांत कासार, नितीन गायकवाड आदी.