देवदान संस्थेचे समाजभूषण पुरस्कार जाहीर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/09/2026 9:04 PM

कुपवाड : येथील देवदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे जिल्हास्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. अनिल मोहिते सर यांनी ५ मान्यवरांची यादी जाहीर केली ती पुढीलप्रमाणे :

सां. मि. कु. मनपा चे माजी उपमहापौर व कुपवाड शहर परिसर संघर्ष समिती चे अध्यक्ष श्री. मोहन बापू जाधव (कुपवाड), 
आष्टा नगरपरिषद चे विद्यमान नगरसेवक श्री. सुहास उर्फ विजयसिंह औघडे (आष्टा), 
नॅशनल पीपल्स पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री. सतिश दादा सनदी (मालगाव), 
सामाजिक कार्यकर्ते श्री. आकाश अण्णा गोसावी (नवजीवननगर कुपवाड, सांगली),
सामाजिक कार्यकर्ते श्री. रघुनाथ उर्फ बाळू निकम 
(वसंतनगर कुपवाड, सांगली)

तसेच संस्थेचे आजीव सभासद डॉ. सिद्धनाथ निशाणदार व डॉ. भरत घाटगे यांनी पी. एच. डी. पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडूंना गौरवण्यात येणार आहे.
सांगली येथे शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय व राजकीय मान्यवरांचे हस्ते वरील पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे संस्थेचे सेक्रेटरी प्रा. अजिंक्य मोहिते व उपाध्यक्ष श्री. संदिप पाटोळे यांनी सांगितले.

Share

Other News

ताज्या बातम्या