कुपवाड शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे त्वरित बसवण्याची मागणी
कुपवाड संघर्ष समिती व छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन समितीच्या वतीने आज महापौर व उपमहापौर यांना करण्यात आली.
कुपवाड शहरात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पुतळे बसविण्याबाबत. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर व उपमहापौर यांना कुपवाड शहर परिसर संघर्ष समिती व छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन समिती गावभाग कुपवाड यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
कुपवाड शहर हे महानगरपालिका क्षेत्रातील एक गजबजलेले आणि वेगाने विकसीत होणारे शहर आहे. या भागातील नागरीकांना प्रेरणा मिळावी आणि आपल्या महापुरषांचा वारसा जपता यावा यासाठी कुपवाड शहरात मध्यभागी व मेनरोड लगत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पुतळे उभारणे अत्यंत गरजेचे आहे. हे दोन्ही महापुरुष आपल्या देशाचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या पुतळयामुळे शहराच्या वैभवात भर पडेल आणि युवा पिढीला त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळत राहील.
संबंधित महानगरपालिकेकडून पुतळ्यासाठी शहरातील मध्यभागी आणि दर्शनी भागातील जागा निश्चित करावी, महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात या दोन्ही पुतळयासाठी विशेष निधीची तरतूद करावी. महानगरपालिकेच्या पुढील होणा-या महासभेत पुतळ्याच्या संदर्भात योग्य तो ठराव करणेत यावा.
अशा मागणीचे निवेदन प्रत महापालिकेचे विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण, स्थायी समिती सभापती अतुल माने, समाज कल्याण सभापती इत्यादी महापालिका पदाधिकारी यांना निवेदन देऊन त्वरित पुतळ्याच्या कामास गती देण्याची विनंती करण्यात आली.
तरी प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करुन पुतळे उभारण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करावी अशी मागणी कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती व छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन गावभाग कुपवाडच्या वतीने करण्यात आली.
त्यावेळी उपस्थित समितीचे कार्याध्यक्ष आशुतोष धोतरे, खजिनदार अरुण रुपनर, सामाजिक कार्यकर्ते आनंदा कांबळे, अख्तरहुसेन मुजावर, उपाध्यक्ष, गोरख व्हनकडे, सचिव दाऊद मुजावर, युवा नेते रमेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील, जालिंदर फार्ने, महेश साळुंखे, मुद्दतसर मुजावर इत्यादी नागिरिक उपस्थित होते.