कुपवाड, : न्यू प्रायमरी स्कूल, कुपवाड यांच्या वतीने मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी अकुज ड्रीमलँड येथे गणपती सजावट व पूजा साहित्य प्रदर्शन व विक्री उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये उद्योजकता, आत्मविश्वास, नियोजन क्षमता, संवादकौशल्य आणि व्यवहारज्ञान विकसित व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक व मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमातील स्टॉलचे उद्घाटन संस्थेचे संचालक *मा. अभिजीत शेटे सर* यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना जीवनातील मेहनत, आत्मविश्वास, नियोजन आणि स्वतःच्या कौशल्याचा योग्य उपयोग करण्याबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
*तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आण्णासो उपाध्ये सर, संस्थेचे उपाध्यक्ष मा. सुरज उपाध्ये सर तसेच संस्थेचे सेक्रेटरी मा. रितेश शेठ सर, सौ आशालाता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल चे मुख्याध्यापक मा. चिरमे सर, पर्यवेक्षक अनिल चौगुले सर यांनी कार्यक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकता (Entrepreneurship) या विषयाची माहिती देत लहान वयापासूनच नवीन कल्पना, मेहनत, जबाबदारी आणि आत्मनिर्भरतेची सवय लावून घेण्याचे महत्त्व पटवून दिले.*
मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून जीवनातील आवश्यक कौशल्ये शिकण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली. “आजचा छोटासा अनुभव उद्याच्या मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकतो,” असा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाला.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी शाळेचे *मुख्याध्यापक मा. जमदाडे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.* तसेच न्यू प्रायमरी स्कूल, कुपवाड येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
विद्यार्थ्यांनी गणपती सजावटीचे साहित्य व पूजा साहित्याच्या माध्यमातून आपली कल्पकता, सर्जनशीलता आणि व्यवहारकौशल्य दाखवून दिले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ विक्रीचा कार्यक्रम न ठरता शिक्षणासोबतच उद्योजकतेचे धडे देणारा आणि भविष्यातील यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविणारा एक प्रेरणादायी अनुभव ठरला.
न्यू प्रायमरी स्कूल, कुपवाड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची नक्कीच प्रेरणादायी दिशा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.