ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

गडचिरोली जिल्ह्यात आज 131 कोरोनामुक्त, 59 नवीन कोरोना बाधित


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 12/1/2020 8:47:50 PM

गडचिरोली,(जिमाका)दि.01:-

         आज जिल्हयात 59 नवीन बाधित आढळून आले. तर आज 131 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7999 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7374 वर पोहचली. तसेच सद्या 542 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 83 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.70 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 6.78 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला.

नवीन 59 बाधितांमध्ये गडचिरोली 24, अहेरी 6, आरमोरी 2, भामरागड 5, चामोर्शी 14, धानोरा 1, एटापल्ली 0, कोरची 1, कुरखेडा 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0  व वडसा येथील 6 जणांचा समावेश आहे. 

आज कोरोनामुक्त झालेल्या 131 रूग्णांमध्ये गडचिरोली 40, अहेरी 21, आरमोरी 25, भामरागड 3, चामोर्शी 15, धानोरा 5, एटापल्ली 2, मुलचेरा 4, सिरोंचा 2, कोरची 5,  कुरखेडा 3 व वडसा मधील 6 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील चन्नावार मेडिकल कॉलनीजवळ नवेगाव कॉम्पलेक्स 3, चन्नावार मेडिकल मागे 1, पीएस स्टेशन 1, साई नगर नवेगांव 2, कन्नमवार वार्ड 1, शांतीनगर 1, सर्वोदय वार्ड 1, स्थानिक 5, कॅम्प एरिया 1, रामनगर 1, नवेगाव 2,पोलीस कॉलनी 1,गोकुल नगर 1, आर्शिवाद नगर 1,  रेव्हेन्यु कॉलनी 2,  अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये  आलापल्ली 3, स्थानिक 3, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये आंबेडकर वार्ड 1,  स्थानिक 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक 5,  चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये अनखोडा 2, स्थानिक 8, सोमनपल्ली 1, घोट 1, आष्टी  2, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व  वडसा तालुक्यातील बाधितामध्ये तुकूम वार्ड 3, कस्तुरबा वार्ड 2, सिंधी कॉलनी 1,  तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये  0, जणाचा समावेश आहे.

राजेश नाथानी (गडचिरोली तालुका प्रतिनिधी)
9422355550

Share

Other News