ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

आता तुरूंग भटकंती ! येरवडा कारागृहापासून जेल पर्यटनाला होणार प्रारंभ.


  • YUNUS KHATIB (Pimpri Chinchwad )
  • Upadted: 1/23/2021 6:26:30 PM

तुरूंगातील जीवनाविषयी ऐकायला आणि बघायला मिळतं.सिनेमा आणि मालिकांमधून तुरूंगातील जीवन पडद्यावर दिसतं. मात्र, प्रत्यक्षात तुरूंग बघायचा असेल, तर तशी सोय आतापर्यंत नव्हती. राज्य सरकारने याचं दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलं असून, तुरूंग पर्यटन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  याची सुरूवात २६ जानेवारी २०२१ पासून होणार आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुरूंग पर्यटन योजनाचं उद्घाटन करणार असून, टप्प्यानं राज्यातील इतर जेलचा यात समावेश केला जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दलची माहिती दिली

Share

Other News