ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सरकारी कामात अडथळा आणल्याने बेडगाव येथील तंमुस अध्यक्षावर गुन्हा दाखल


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 4/19/2021 6:05:29 PM

कोरची :-
           कोरची तालुक्यातील बेडगाव येथील तंमुस अध्यक्ष रामभाऊ नागरे यांनी सरकारी कामात अडथळा आणत वैदयकीय अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी दिल्याने कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, कोरची तालुक्यातील बेडगाव येथील तंमुस अध्यक्ष रामभाऊ नागरे यांच्या पत्नी कोरोनाबाधित निघाल्याने त्यांच्यावर कोरची येथील कोविड केंद्रात उपचार सुरू आहे. उपचारादरम्यान कोविड केअर केंद्रामध्ये रुग्णाला भेटन्यास कोणासही मुभा नाही मात्र रामभाऊ नागरे हे आपल्या पत्नीला औषधी आणून देतो ते द्या असे म्हणत  सरकारी कामात अडथळा आणत होते. 
            तसेच कोविड केअर केंद्रामध्ये कार्यरत वैदयकीय अधिकारी डॉ सचिन बरडे यांनी कोरची पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दाखल केली  यावरून कोरची पोलीस ठाण्यात तंमुस अध्यक्ष  रामभाऊ नागरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आशिष अग्रवाल (गडचिरोली जिल्हा मुख्य संपादक)
7757005944

Share

Other News