ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

IMA, GAMP व नगर परिषद गडचिरोली व च्या संयुक्त विद्यमाने १०० बेडचे कोविड सेंटर उभारणार - आ.डॉ देवराव होळी


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 4/19/2021 6:53:35 PM

◾ गडचिरोली येथे कोविड सेंटर उभारण्यासंदर्भात आमदार डॉ देवराव होळी यांची खाजगी रुग्णालयांशी चर्चा

◾ नगर परिषद गडचिरोली येथे खाजगी डॉक्टरांशी चर्चा

◾ गडचिरोलीतील नामांकित डॉक्टरांची उपस्थिती

गडचिरोली दि.१९ एप्रिल २०२१ :- 

           गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व कोरोणाचा प्रकोप बघता  जिल्हा केंद्रांवर  कोविड सेंटर उभरण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली बैठकीमध्ये IMA, GAMP व नगर परिषद गडचिरोली  च्या संयुक्त विद्यमाने १०० बेडचे सेंटर उभारण्यावर भर देण्यात आला व सर्व खाजगी डॉक्टरांनी याला सहकार्य करण्याची तयारी दाखविली बैठकीला नगराध्यक्षा सौ योगीताताई पिपरे,उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,नगरसेवक प्रमोद पिपरे, सभापती प्रशांत खोब्रागडे, मुख्याधिकारी संजय ओव्हाळ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ शिवनाथ कुंभारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मडावी, डॉ सचिन कामडी, डॉ  नितीन कोडवते, डॉ बिडकर, डॉ कैलाश नगराळे, डॉ. प्रशांत चलाख, डॉ.सौरभ नागुलवार, डॉ.अद्वैय अप्पलवार, डॉ यशवंत दुर्गे, डॉ पर्वते यांचे प्रतिनिधी, अनील तिडके, यांचेसह  प्रामुख्याने उपस्थित होते.
          बैठकीमध्ये गडचिरोली जिल्हयातील कोरोना  परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली व अत्यंत तातडीने कोरोना सेंटर उभे करण्यावर भर देण्यात आला. त्याकरिता बोदली येथील खाली असलेले  इंजिनिअरिंग कॉलेज, कृषि महाविद्यालय, मुलांचे वस्तीगृह ताब्यात घेऊन त्याठिकाणी कोविड सेंटर  उभे करण्यावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये ऑक्सीजन सह उत्तम आरोग्य व्यवस्था देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.


रोशन कवाडकर
(गडचिरोली जिल्हा समन्वयप्रमुख)
9405134666

Share

Other News