ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

बलकवडे यांच्या प्रयत्नातुन भगुरला  कोंविंड सेंटर मंजूर


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 4/20/2021 3:41:44 PM

भगुर ता.(वार्ताहर) शहरात वाढते कोंविंड रुण पाहता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाअध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे यांच्या झेप फाउंडेशनच्या प्रयत्नातुन आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाने भगुरला कोंविंड सेंटर मंजूर करण्यात आले असून लवकरच सुरू होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अँड गोरखनाथ.बलकवडे यांनी दिली. बलकवडे परिवाराकडून प्रशासनाला सेंटर सुरु करण्यासाठी मोफत जागा व बॅड व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भगुर शहरात २० हजार लोकसंख्या असुन शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जागा नसून भगुर नगरपालिकेचा दवाखाना आहे आणि नागरिकांना खाजगी दवाखान्यात जाणे परवडत नसल्याने अनेक कोरोना
रुग्ण देवळाली छावणी परिषद नाशिकरोड बिटको येथे उपचार घेत आहे तर अनेकांना बेड उपलब्ध नाही
अनेक रुग्ण घरीच राहून उपचार घेत खुलेआम भगुर
शहरात फिरत असल्याने आजरोजी ४८ ते ५० रुग्ण कोरोना बाधित आहे त्यामुळे भगुरला कोविड सेंटर मिळावे याकरिता राष्ट्रवादी महिला जिल्हाअध्यक्ष.सौ .प्रेरणा बलकवडे यांनी शासनाने प्रस्ताव पाठवुन तसा 
पाठपुरावा केला त्यानुसार बलकवडे व्यायाम शाळा हाँलमध्ये ५० खाटांचे केद्रास मंजुरी मिळाली आणि लवकरच सुरू होणार आहे यात भगुर रहिवाशांना प्रथम प्राधान्य देऊन सुसज्ज राहणार आहे

Share

Other News