सही अंगठा

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 13/05/2021 8:16 AM

             वरील शब्द एक हिंदी भाषेतील आहे. आणि एक मराठी भाषेत आहे. मात्र याचा अर्थ एकसारखाच आहे. सही म्हणजे बरोबर असा अर्थ होतो. पूर्वी लोक अडाणी अशिक्षित रानटी होती. कुठल शिक्षण कुठले कोण बरे वाईट सांगणारे. गावागावात यांना लुटण्यासाठी सावरकर आ वासून उभे होते. आपण बर्याच वेळा असे पाहिले आहे की कोरया कागदावर अंगठा घेऊन या चोरांनी लोकांच्या जमीन घर लिहून घेतली. लिहायला वाचायला येत नाही काय लिहिलंय कळत नाही त्यामुळे अशा लोकांची लुटच केली जात होती. सावकारांनी या अशा अडणी गरजू लोकांच्या बायका सुध्दा व्याजापोठी ओलिस घेतल्याचे प्रकार घटना आपण वाचतो बघतो. पण आपण काहीच करू शकत नाही.कारण याला अडव येतं ते म्हणजे त्यावेळचे अशिक्षित पण  कायतरी करायला पाहिजे. अशी धारणा मनात घेवून. समाजसेवक.
            समाजहिताचिंतक लोकांनी आपले विचार लोकांच्या पुढं मांडायला सुरुवात केली. शिक्षण नसल्यामुळे होणारे तोटे त्यांना समजावून सांगितले. आणि लोकांना स्वता व आपल्या मुलांना मुलींना महिलांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. आणि एक वेळ समाजाला जाग आली आणि समाज शिक्षणाकडे वळला. समाजातील शंभर पैकी आठ दहा लोक साक्षर झाली. ते इतरांना शिक्षण देवू लागली.  यातच हळूहळू इंग्रजी माध्यमाचा वापर शिक्षणात होऊ लागला. लोक लिहायला वाचायला शिकली. अंगठा निशाणी केल्यामुळे काय आपले नुकसान होते हे ध्यानात यायला लागले. मी काही ठिकाणी पाहीले आहे मृत्यू व्यक्तिचा सुध्दा अंगठा उठवून त्याची घर जमीन काबिज केल्याचे प्रकार पहायला मिळतात याला त्या त्या शेत्रातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून हे सर्व साध्य केले जाते. काळ बदलला तंत्रज्ञान सुधारले टपालाची जागा मोबाईल फोन याने घेतलीं. आणि मग अंगठा बांधनी नियम अमलात आला. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासमोर अंगठा करणे बंधनकारक करण्यात आले. 
           शिक्षण घेतल्यामुळे व्यक्ति पहिली सही मोडी लिपी मध्ये करण्यास सुरुवात केली. काहीजण आपले पूर्ण नाव सहीसाठी वापरायला लागले. काहीजण इंग्रजी मध्ये सही करायले लागलें. मुलाला शाळेत दाखला घेताना सहीचा वापर होण्यास सुरुवात झाली.  बक्षिसपत्र. अॅपेडिवहिट. जमीन वारस हक्क  खरेदी विक्री. जातीचा दाखला. रहिवासी दाखला.  पोलिस ठाण्यात जामीन  बॅकेस जामीन  साक्षीदार  मध्यस्थी  असे एक नाही विविध शासकीय दाखल्यावर असणार्या त्या त्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सहीला एक वेगळंच महत्व आहे. 
             सहीला एक वेगळंच महत्व आहे  कारण  अधिकार व कर्मचारी निवडी. पोलिस भरतीपूर्व. ग्रामपंचायत. पंचायत समिती. जिल्हा परिषद.घरकुल योजना. महसुली विभागाच्या विविध योजना. अपंग योजना.  जिल्हाधिकारी कार्यालय. यांच्या अंतर्गत येणारे विविध विभाग यांच्यातील पदाधिकारी निवडीसाठी संबंधित विभागाच्या अधिकारी यांची सही याला प्रथम स्थान दिले जाते. आपणं दवाखान्यात. शालेय शिक्षण. व्यवसायिक शिक्षण. नोकरी ठिकाणी वशिलेबाजी  शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी. शिफारस करण्यासाठी एखाद्या सामाजिक संघटना सेवा भावि संस्था. नामांकित व्यक्ती यांच्याकडून येणारे शिफारस पत्र यांवर असणारी सही याला एक अनन्य साधारण महत्व आहे.
          निवडणूक चालू झाली की अर्ज भरताना सही. मतदार यांना पैसे वाटताना घेतलीं जाणारी मतदारांची सही. निवडून आल्यावर मी माझ्या कर्तव्य पूर्ण पणे क्षमतेने पार पाडीन म्हणून शपथ घेताना केली जाणारी सही. आपण निवडून आल्यावर आपल्या कामासाठी काढलेला जाहिरनामा त्यावर असणारी सही. एखाद्या वेळी देशांवर आपत्कालीन परिस्थितीत आणीबाणी जाहीर करण्यासाठी राष्ट्रपती यांनी केलेली सही. आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये कोणताही निर्णय घेताना जनमत विचार न घेता नेते पुढारी यांनी संबंधित भागात  जमावबंदी. टाळेबंदी. संचारबंदी. असे विविध निर्बंध लावण्यासाठी एका सहीवर तो गाव तालुका जिल्हा बंद करण्याचा अधिकार या सही मुळे येतो. संबंध जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनी कोणताही आदेश जारी करताना करण्यात येणारी सही. बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज यावर संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी ते पत्र स्विकारताना सही करणे अनिवार्य आहे. त्या पत्राचे कोणतेही संबंधितांना उत्तर देणे बंधनकारक आहे पण ते अमलात आणले जात नाही फक्त आपली जबाबदारी म्हणून पत्र स्विकारायच आणि सही करायची  
           सहीची चांगली बाजू आपण बघितली आत्ता वाईट बाजू एखाद्या आॅफिस कडून. टेंडर. निलाव प्रकिया. सर्वच बांधकाम विभाग यामध्ये मोठी मोठी रस्ते. पुल बोगदे. धरणे. कालवे. बंधारे. अशी विविध. कोट्यावधी रुपयांची कामे बोगस टेंडर भरुन कंत्राटदार ठेकेदार. संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर राजकीय दबाव आणून एका सहीने मंजूर करून घेताना आपणं बघतो. अधिकारी व कर्मचारी सरळ आपल्या पटात बसणारा असेल तर ठिक आहे नाहीतर त्याला. शिवीगाळ करणे.  जीवे मारण्याची धमकी देणे. अंगावर गाड्या घालणे. अपहरण करणे. त्यांच्या मुलांचे अपहरण करणे. आणि एवढे करूनही नाही जमलं तर त्या अधिकार व कर्मचारी यांचा खून केलेल्या बातम्या आपणं बघतो वाचतो. म्हणजे एका सहीने एखाद्याचे नशिब बदलतं आणि त्याच सहीने त्याचे जीवन व नशिब नष्ट होते ‌
               सर्वात मोठा भ्रष्टाचार हा एका सहीने होतो. उदा. सांगायचे झाले तर बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शाॅप इन्स्पेक्टर यांची सही लागते   पण आज बोगस कामगार नोंदणी मग होतें कशी. अशा बोगस कामगार नोंदणी साठी जो अधिकार व कर्मचारी यांच्या सह्या होत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशा अधिकार व कर्मचारी यांच्यामुळे बोगस कामगार नोंदणी होत आहे. "तुम्ही खा आम्ही खातो " असं ब्रिद वाक्य असू शकत काय. शासनाने ज्या अधिकार व कर्मचारी यांना सहीचा अधिकार दिला आहे त्यांनी तो सक्षमपणे राबविला पाहिजे. संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या एका सहीसाठी दिवसभर कार्यालयाच्या बाहेर लोकांच्या रांगा मी पाहिल्या आहेत. भरतीला उतरलेल्या मुलांना सुध्दा संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून हीन वागणूक दिली जाते.  एका सहीसाठी त्यांच्याकडे एक विशिष्ट रक्कमेची मागणी केली जाते. 
          म्हणजे इंग्रजी भाषेतच सही करावी असा कायदा नाही. मातृभाषा अगोदर आणि मग इतर काही. एक सही काय करू शकते मोठी ताकद आहे यात. पदांवर असणारा अधिकार व कर्मचारी काना आंधळा बहिरा अपंग आहे किंवा अन्य काही त्याला महत्व नाही त्यांच्या हातात असणारी सत्ता सही करण्याची ताकद बघा. म्हणजे एकंदरीत एखाद्याला सत्तेवर आणण्यासाठी किंवा नोकरी देण्यासाठी किंवा त्या पदावरून नोकरी हून काढून किंवा पदोन्नतीसाठी सही किती गरजेची आहे 
          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा मौलाना आझाद विचार मंच सांगली माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९ 
          आमचा गाव तालुका जिल्हा राज्य देश आत्ता पुन्हा एखादा स्वतंत्र करून घेण्याची गरज आहे. घराणेशाही. हुकूमशाही. दहशतवाद. टोळीयुद्ध. बेरोजगारांची समस्या. वाढती तरुण बेरोजगार. वाढती व्यसनाधीनता. वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक आर्थिक लुबाडणूक यातून आपणांस आपल्याचया कडूनच आपले स्वतंत्र पुन्हा मिळविण्यासाठी पुन्हा एकदा. चलेजाव चळवळ. १८५७ बंड. असे विविध माध्यमातून उठाव करावा लागणार.






देवेंद्र देविकार (विदर्भ प्रमुख संपादक)
7588888787

Share

Other News

ताज्या बातम्या