आवाहन

सांगली जिल्हा क्रीकेट संघाची उपांत्य फेरीत धडक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/10/2025 4:07 PM

प्रतिनिधी : पुणे येथे चालू असलेल्या १५ वर्षाखालील गर्ल्स  इन्व्हिटेशन लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज उपांत्य पूर्व सामना जिंकून सांगली संघाने उपांत्य सामन्यात प्रवेश केला. सांगली विरुद्ध मेट्रो क्लब पुणे या संघामध्ये  मध्ये झाला या सामान्या मध्ये सांगली संघाने गोलंदाजी मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत मेट्रो क्लबचा संघ १३७ धावावरती संपुष्टात आणला. १३८ धावांचे आव्हान सांगली संघा समोर  विजयासाठी असताना हे आव्हान बिनबाद कृष्णा व सोनल यांनी एकहाती हा सामना जिंकून दिला . कर्णधार कृष्णा सगरे हिने आक्रमक फलंदाजी करत नाबाद ७२ धावा केल्या तिला सोनल शिंदे हिने संयमी फलंदाजी करत नाबाद ४५ धावा केल्या व एक चांगली भागीदारी करत विजय आपल्या बाजूने  खेचून आणला. 

आजच्या सामन्यामध्ये  बॉलिंग मध्ये  स्नेहल पवार व वैष्णवी भंडारे यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले व कृष्णा सगरे, श्रेया जगदाळे, तेजस्वी हिप्परकर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला  

 या विजयानंतर महाराष्ट्राची क्रिकेट असोसिएशन संघाचे खजिनदार माननीय संजयजी बजाज व राज्य टूरनामेंट कमिटी सदस्य निलेश शहा  यांनी सर्व खेळाडू ,प्रशिक्षक  व सिलेक्टर यांचे अभिनंदन व कौतुक केले

Share

Other News

ताज्या बातम्या