सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 17 मधील मंगलमूर्ती कॉलनी एका अंडरग्राउंड ट्रेनचे झाकण तुटले असून ते बदलण्याऐवजी महापालिका प्रशासनाने त्यावर चक्क बंद असणाऱ्या घंटागाडीलाच उभे केले आहे. हे पाहिल्यानंतर कोट्यावधी रुपये चा चुराडा करणाऱ्या महापालिका प्रशासनाकडे साधे ड्रेनेचे झाकण नसेल तर, पहावे ते नवलच असे खेदाने म्हणावे लागते.
गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी झाकण लावले गेले नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. अशा तऱ्हेने ड्रेनेजवर बंद असणारी घंटागाडी लावणे कितपत योग्य आहे? कारण या ठिकाणी कधीही दुर्घटना घडून एखाद्या नागरिकाचा जीव धोक्यात येऊ शकतो, एवढी साधी बुद्धी महानगरपालिका प्रशासनाकडे नाही का? आरोग्य विभागाचे अधीक्षक नेमके काय करतात? का त्यांचे लक्ष फक्त मलईवरच आहे? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडल्या वाचून राहत नाही. सध्याचे दिवस हे सणासुदीचे दिवस असल्याने रस्त्यावर नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणावर असते. अशावेळी एखादा नागरिक या ड्रेनेजमध्ये पडण्याची दुर्घटना होण्याआधी येत्या दोन दिवसांमध्ये सदर ड्रेनेजवर झाकण बसवण्यात यावे. अन्यथा महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लोकहित मंचच्या वतीने देण्यात येत आहे.
*मनोज भिसे- अध्यक्ष लोकहित मंच सांगली*