कोल्हापूर रोड येथील अतिक्रमण काढन्याची कारवाई सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मा आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशाने उपायुक्त स्मृती पाटील मॅडम व टीम चालू आहे स्थानिक नागरिकांच्या व समस्त कुस्ती आखाडा प्रेमी आग्रहामुळे जागेवर जाऊन पाहणी करून आलो.
सदर ठिकाणी जी खोकी आहेत त्यांचे मूळ ठिकाण कोणते आहे ते सदर ठिकाणी कोणत्या आदेशाने आले आहेत मूळ मालक व्यवसाय करतात का पोट भाडेकरू आहेत ह्याची चौकशी मनपा ने करणे आवश्यक आहे
सदर रोडवर आता पर्यंत कित्येक सामान्य नागरिक जखमी झालेले आहेत तसेच किमान आठ ते दहा जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे त्याला जबाबदार कोण आहे..?
सांगली शहराला एक सुधा चांगली एन्ट्री मिळाली नाही ह्याला जबाबदार कोण आहे..?
चांगल्या कामाला सर्व सामान्य नागरिकांनि पाठिंबा देणे आवश्यक आहे त्या शिवाय प्रशासन काम करणार नाही
काही लोकांची अडचण होणार आहे मात्र त्यांला नाईलाज असतो
चुकीच्या पद्धतीने खोकी बसवताना विचार केला जात नाही मग अश्यावेळी त्रासाला सामोरे जायला लागत
शहराच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला पाहिजे ...
सतीश साखळकर शंभूराज काटकर आनंद देसाई गजानन साळुंखे
सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा