ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

शिवसेनेचा प्रयत्नाने उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर रुग्णांचा सेवेत दाखल


  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 5/13/2021 9:09:49 PM


'अखेर शिवसेनेचा पाठपुराव्याला आले यश'

रोहित बोंबार्डे
तुमसर प्रतिनिधी दि.१३ : राज्य शासनाने तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दोन व्हेंटिलेटर मागील वर्षी पुरविले होते. परंतु ते हाताळण्यासाठी निगडित मेडिसिनचे चिकित्सक (एम.डी.) डॉक्टरांच्या मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने व्हेंटिलेटर रुग्णालयात धूळखात पडून होते. सदर याप्रकरणाची माहिती शिवसैनिकांना मिळताच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरची पाहणी करून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला होता. सदर रुग्णालयात व्हेंटिलेटर हाताळण्याचा अनुभव फक्त वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन बाळबुद्धे यांनाच होते. परंतु, बाळबुद्धे डॉक्टर कोरोना संसर्गामुळे आजारी पडले होते आणि ते रजेवर होते. त्यामुळे व्हेंटिलेटर हाताळण्यास डॉक्टर उपलब्ध नसल्याची माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली होती. याप्रकरणी शिवसेनेने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सातत्याने पाठपुरावा व पत्रव्यवहार करण्यात आला होता. शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बाळबुद्धे पुन्हा सेवेत रुजू होताच बंद अवस्थेत असलेले व्हेंटिलेटर अखेर गुरुवार रोजी सुरू करून रुग्णांच्या सेवेत दाखल करण्यात आले.
परंतु, व्हेंटिलेटर रुग्णांचा सेवेत २४ तास सुरू ठेवण्यासाठी येथे अजूनही मेडिसिनचे चिकित्सक (एम.डी.) डॉक्टरांची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळबुद्धे यांनी सांगितले. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे शिवसेना पुढेही सातत्याने पाठपुरावा करत राहील, अशी माहिती शिवसेनेचे भंडारा व गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, युवासेनेचे पवन खवास, सतीश बन्सोड, अरुण डांगरे, निखिल कटारे, परिचारिका प्रमिला निमजे, नंदनी मेश्राम सह रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.


Share

Other News